व्हॉट्सॲप मेसेजेससाठी आता जबरदस्त फीचर; आता रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२२

व्हॉट्सॲप मेसेजेससाठी आता जबरदस्त फीचर; आता रिॲक्शन्स देण्याची सोय उपलब्ध!
रिॲक्शन्ससाठी 👍❤️😂😮😢🙏यांचा वापर करू शकता. येत्या काही दिवसात अपडेटद्वारे ही सोय तुम्हाला मिळेल!

‘मेटा’च्या मालकीच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या (Whats App) एका फिचरची बऱ्याच दिवसांपासून युजर्स वाट पाहत होते. या फिचरची चाचणी सुरु होती. आता प्रतीक्षा संपली असून, लवकरच हे खास फिचर युजरच्या बोटाच्या तालावर फिरताना दिसणार आहे.. ‘रिअ‍ॅक्ट फीचर’ (Reactions Feature) असं या फिचरचं नाव आहे..

मेटा’चे ‘सीईओ’ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबूक पोस्टद्वारे या खास फिचरबाबत माहिती दिलीय. त्यानुसार, व्हॉट्स अ‍ॅप रिअ‍ॅक्शन्सचे अपडेट 5 मेपासून सुरू होत आहे. या नवीन फिचरनुसार, व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्ते आता ‘फेसबूक मेसेंजर’ आणि ‘इन्स्टाग्राम’ संदेशावर ‘इमोजी’ प्रतिक्रिया देऊ शकतील.