WhatsApp Group Admin करू शकणार मॅसेज डिलिट - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, मे ०७, २०२२

WhatsApp Group Admin करू शकणार मॅसेज डिलिट

व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचा फैलाव होऊ नये, यासाठी व्हॉट्स ॲपने आता या ग्रुप ॲडमिनला आणखी अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप चॅटवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्या अपडेटेड व्हर्जनमध्ये दमदार फिचर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्हर्जन 2.22.11.4 वर हे अपडेट मिळणार आहेत.

व्हॉट्स ॲप ग्रुप ॲडमिनला आता ग्रुपमधील कोणाचाही, कोणताही मेसेज डिलीट करण्याचा अधिकार असणार आहे.. ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने मेसेज पाठवला नि त्यावर ॲडमिनला काही आक्षेप असल्यास त्याला तो मेसेज डिलीट करता येणार आहे.. ग्रुप ॲडमिनने असा मेसेज डिलिट केल्यावर युझर्सना त्यावर ‘this was removed by an admin’ असं दिसेल.व्हॉट्स ॲपकडून या अपडेटसह आणखी एका फिचरवर काम सुरु आहे. ते म्हणजे, डिलीट मेसेजसाठी वेळमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. सगळ्यांसाठी मेसेज डिलीट करण्याची कालमर्यादा आता 2 दिवस आणि 12 तास होण्याची शक्यता आहे.


व्हॉट्स ॲपकडून स्टेटसवर प्रतिक्रिया देण्यासाठी नुकतेच सहा ‘इमोजी रोल आऊट’ फिचर आणले आहे. हे इमोजी यापूर्वी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उपलब्ध होते. आता ते व्हॉट्स ॲपवरही वापरता येणार आहेत. त्यात लाईक, लव्ह, हसणे, सरप्राईज आणि दु:खी अशा इमोजींचा समावेश आहे.