व्याहाड बुज. ते मोखाडा पेट्रोल पंपजवळ दोन मुलांचा मृत्यू घातपातातून झाल्याचा पालकांचा आरोप - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मे ०६, २०२२

व्याहाड बुज. ते मोखाडा पेट्रोल पंपजवळ दोन मुलांचा मृत्यू घातपातातून झाल्याचा पालकांचा आरोप
सावली तालुक्यातील व्याहाड बुज. ते मोखाडा पेट्रोल पंपजवळ 2 मुलाचा अपघात झाला, असे सांगण्यात आले होते. मात्र तो अपघात नसून , प्रेम प्रकरणातून घातपात असल्याचा आरोप मृतक मुलांचे पालक देवाजी सोयाम, देवीलाल दादोरिया यांनी केला.
आज 6 मे रोजी चंद्रपूर येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

घटना घडून सहा-सात महिन्याचा जवळपास कालावधी होत असताना सुद्धा सावली पोलिसांनी आतापर्यंत घटनेची सखोल चौकशी केली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.दिनांक 15 नोव्हेंबर 2021रोजी चंद्रपूर-गडचिरोली हायवे महामार्गावर पेट्रोल पंप कडे पहाटे साडेचार वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. तेव्हा दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र अक्षय प्रकाश रामटेके याला किरकोळ जखम झाल्याने गडचिरोली येथे भरती करण्यात आले. सोबत असलेले अंकुश सोयाम व दीपक दादरिया या दोघांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत पोलिसांनी केलेली चौकशी संशयाच्या भोव-यात असल्याचा आरोप  केला असून, याप्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Vyahad Buz. Parents allege that two children were killed in an accident near Mokhada petrol pump