गावातील एका व्यक्तीला वाघाने ठार केले - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, मे ०५, २०२२

गावातील एका व्यक्तीला वाघाने ठार केले

आज सकाळी ८ च्या सुमारास तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील नागभिड (Nagbhir) तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी गावातील एका व्यक्तीला वाघाने ठार केले. नवेगाव हंडेस्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम वय ६० वर्ष हा सकाळी ७ वाजता तेंडू पत्ता तोडण्यायाकरिता शिवारातील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने (Tiger) ठार केले.


वन विभाग नागभिड येथे माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले. वन विभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करिता सानुग्रह अनुदान देण्यात आले. यानंतर शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले.  


Tiger killed a person of navegaon hundeshwari village of naghbid tahsil in chandrapur dist.he gone for tendu leaf collection around 8am this morning.