शहरातील विविध समस्यांना घेवून माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांचे मनपाला निवेदन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, मे ०५, २०२२

शहरातील विविध समस्यांना घेवून माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांचे मनपाला निवेदन

विविध समस्यांना घेवून माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांचे मनपा ला निवेदनचंद्रपूर शहरातील विविध समस्यांना घेऊन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांनी आज ५मे रोजी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले.

चंद्रपूर शहर अतिउष्ण शहर असून, सध्या उन्हाळा सुरु असल्याने पाणी टंचाई भासत आहे. शहरात नळ आहेतर पाणी नाही, तसेच हातपंप देखील बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई असलेल्या भागात सर्वे करून अहवाल तयार करण्यात यावा तसेच ज्या ठिकाणी पाणी टंचाई अधिक आहे, तेथे योग्य ते नियोजन करून पाणी टंचाईवर मात करावे, अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती ब्रीजभूषण पाझारे यांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विजय बोरीकर यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी बंगाली कॅम्प ते एमइएल या मार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरु करावेत, इंदिरानगर येथील मंजूर झालेल्या नालीचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम यांची उपस्थिती होती.  
Statement of former social welfare chairman Brijbhushan Pajare to the corporation regarding various problems in the city