चंद्रपूर : बहुजन समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२६ मे २०२२

चंद्रपूर : बहुजन समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नगरसेविकेचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आज 26 मे रोजी
झालेल्या सोहळ्यात चंद्रपूर येथील बहुजन समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर करांगल, नगरसेविका श्रीमती राजलक्ष्मी सुधीर करांगल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


या पक्ष प्रवेश कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, मंत्री प्राजक्त तनपुरे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई कार्याध्यक्षा राखीताई जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, निरीक्षक प्रविण कुंठे उपस्थित होते.या दोन्ही कर्तृत्ववान नेतृत्वाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल हा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.