वाघ हल्ल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे सुनील दहेगावकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मे २०, २०२२

वाघ हल्ल्यासंदर्भात राष्ट्रवादीचे सुनील दहेगावकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ हल्ल्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवार यांची भेट
चंद्रपूर जिल्ह्यात मागील ५-६ वर्षात वाघ,बिबट आणि अस्वलाच्या हल्यात १७५ नागरिक मृत्यु पावले आणि ४३३ नागरिक जखमी झाले.हि भयावह परिस्थिती पाहता नागरिकावरील वन्य प्राण्याचे वाढते हल्ले रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या मागणीसाठी काल रात्री दि.१९ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांची कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

गोविंदबाग बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष सुनिल दहेगांवकर यांनी निवेदन दिले.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जानगर कॉलनी व प्लांट, दुर्गापूर परिसरात घडलेल्या वाघाच्या घटना बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यावर या सर्व बाबींचा लवकरच आढावा घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
NCP's Sunil Dahegaonkar called on Sharad Pawar regarding tiger attack