येणाऱ्या दिवसात महिला काँग्रेस चे काम आणखी जोमाने करणार : महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांची प्रतिक्रिया - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे २९, २०२२

येणाऱ्या दिवसात महिला काँग्रेस चे काम आणखी जोमाने करणार : महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांची प्रतिक्रिया

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नम्रता आचार्य ठेमस्कर

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या जिल्हाध्यक्षपदी नम्रता आचार्य- ठेमस्कर (Namrata themskar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेश प्रभारी मंत्री ममता भूपेश आणि प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी या नियुक्तीची यादी शनिवारी काढली.

काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान करणारा आहे. महिलाच्या अधिकारासाठी पक्षाने नेहमीच भूमिका घेतली आहे. नम्रता आचार्य यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव म्हणून काम करताना जिल्ह्यात त्यांनी अनेक अभिनव आंदोलने केली. कोरोना काळातही त्यांनी 'एक घास मदतीचा' हा उपक्रम संपूर्ण राज्यात सर्वाधिक दिवस चालवला.

त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात पूर आला तेव्हा त्यांनी मदतीचा एक हात हा उपक्रम राबवून सर्वाधिक मदत चंद्रपूर जिल्ह्यातून पाठवली होती. त्याचप्रमाणे 'रसोई की बात', 'राखी महोत्सव' या सारखे उपक्रम राबवून सामन्य लोकांशी महागाई वर चर्चा आयोजित केल्या. त्यामुळे अल्पवाधीतच त्यांना जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त झाला. अजूनही त्यांचा शासकीय रुग्णालयात 'मदत व सल्ला केंद्र' हा उपक्रम सुरूच आहे.

राजकारण करत असतांना सामाजिक बांधिलकी ठेऊन काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. याची दखल पक्ष श्रेष्ठींनी घेऊन त्यांना माहीला काँग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

येणाऱ्या दिवसात महिला काँग्रेस चे काम आणखी जोमाने करणार आहे असे त्यांनी सांगितले. याच सोबत राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेत्ता डीसुजा, महिला काँग्रेस च्या राज्य प्रभारी ममता भुपेश, महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांचे त्यांनी या नियुक्ती साठी आभार मानले आहे. त्यांच्या नियुक्ती ने महिला काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.