काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नम्रता ठेमस्कर, तर महानगर अध्यक्षपदी संगीता अमृतकर यांची निवड - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे २९, २०२२

काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नम्रता ठेमस्कर, तर महानगर अध्यक्षपदी संगीता अमृतकर यांची निवडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीने सर्व जिल्ह्यातील महिला अध्यक्ष आणि शहर अध्यक्षांची फेररचना केली असून, नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात चंद्रपूर जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षपदी नम्रता ठेमस्कर (Namrata Themskar), तर महानगर अध्यक्षपदी संगीता अमृतकर (Sangita Amrutkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नम्रता ठेमस्कर या मागील दोन वर्षांपासून पक्षामध्ये सक्रिय असून, प्रदेश कार्यकारणीत सहसचिव पदी कार्यरत होत्या. चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागांमध्ये पक्ष संघटन करण्यासाठी त्यांनी corona मध्ये देखील विविध उपक्रम राबवले. पक्षाची बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. महानगर अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या संगीता अमृतकर या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आहेत. शहरातील विविध समस्यांना घेऊन झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल आज 29 मे रोजी पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन नम्रता ठेमस्कर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी सुनीता ताई धोटे, शितल कातकर, लता बारापात्रे यांची उपस्थिती होती.