लक्ष्मीस्वरूपा अनसूया मातेचा जन्मोत्सव व मंदिराचा वर्धापन कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ मे २०२२

लक्ष्मीस्वरूपा अनसूया मातेचा जन्मोत्सव व मंदिराचा वर्धापन कार्यक्रम





दिलीप पनकुले परिवार आयोजित विश्वमोहिनी अनसूया माता ह्यांच्या कृपाळू कृपेने व आपणा सर्वांच्या साक्षीने पारडसिंगा निवासिनी महालक्ष्मी अनसूया ह्यांच्या ९६ व्या जन्मोत्सव व मंदिराचा २२ वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक ५ मे २०२२ रोजी मा. शिरीष वऱ्हाडपांडे ह्यांच्या पौराहित्याखाली अनसूया माता मंदिर, शांती विद्या भावन परिसर, डिगडोह (देवी) हिंगणा रोड, नागपूर येथील शाळेच्या प्रांगणात साजरा होत आहे. ह्या धार्मिक उत्सवाला माजी मंत्री मा. रमेशजी बंग, मा. आमदार दीनानाथ पडोळे, प्रभाकरराव देशमुख, मा. हरीषजी दुबे, माजी निगम प्रमुख, सरपंच मा. इंद्रायणी काळबांडे, प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, मा. अनिल अहीरकर, सौ. आभाताई पांडे, महिला आयोग सदस्या, मा. श्री. उमेशसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य, मा. कैलास गिरी, उपसरपंच, कैलास चोपडे, मा. श्री. विजू पांडे यांना निमंत्रित केले आहे.
      सकाळी ७:०० वाजता मातेचे मंगलस्नान व पालखीची पूजा आचार्य हरिक्रिष्ण मिश्रा व आचार्य विवेक तिवारी ह्यांच्या मंत्रोच्चाराने संपन्न होईल. सकाळी ८.०० वाजता मंगलआरती व होमहवन, सकाळी ८. ३० वाजता  मातेची पालखी व दिंडी सोहळा दीपक रडके, विजय कोटगुले, राहूल पांडे, नगरसेवक आयोजित डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात डिगडोह गावात अभिजित शेंडे, परमात्मा ग्रुप, नितीन रडके, संजय कोल्हे, रितेश कोल्हे अल्पोपहार वितरण, संतोष यादव पेय वाटप फैजल शेख ह्यांचा सहभाग राहणार आहे. श्री. जगदीश बँड पार्टी देविदास हरिदास अडांगळे ह्यांच्या मंगलधूनसह संपन्न होईल. सकाळी ११.३० वाजता महाआरती, छप्पन भोग व महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ४.०० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम सोहळा, आयोजक, पं. हरिक्रिष्ण मिश्र (वेदाचार्य) आयोजित जय दुर्गा भजन मंडळ, डिगडोह व सायंकाळी ४.०० ते ६.०० दत्ता गणोरकर यांचे अनसूया माता भजन मंडळ, नागपूर, ६.०० ते ७.३० आईचा गोंधळ व जागरण (पराग गोंधळी), मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, महाप्रसाद व गोपालकाला वितरण करण्यात येईल. 
        आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार व इष्टमित्रांसह उपस्थित राहून परमेश्वर चरणी आपली सेवा तन मन धनाने रुजू करावी, अशी विनंती दिलीप पनकुले परिवार तसेच शांती विद्या भवनचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच डॉ. रमेश पाटील, सुभाष वऱ्हाडे, मा. गणेश धानोरकर, अॅड. प्रमोद शिंदे, वसंत घटाटे, प्राची ढोले, संजय खटीक, श्रृती सुधीर मुलमुले, अजय धोटे, बंडू ढोले, सौ. भावना अतुल टोळ, सूचिता बाराहाते, मधुकर भावसार, संजय शेवाळे, प्रा. एस. के. सिंह, भाईजी मोहोड, लाला नागपुरे, सरदार रवींद्रसिंह मुल्ला, अशोक बैसवारे, सोपानराव शिरसाट, प्रमोद वानकर, विनोद पानतावणे, बबलू चौहान, मंदार हर्षे, श्रीनिवास दुबे, योगेश चौधरी ह्या भक्तगणांनी केली. 


Mother's birth anniversary and temple anniversary program in the form of Lakshmi Ansuya