आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा MLA Kishor Jorgewar had a discussion with Chief Minister Uddhav Thackeray - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मे २४, २०२२

आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा MLA Kishor Jorgewar had a discussion with Chief Minister Uddhav Thackeray

कळमना येथील बांबू आगीच्या घटनेसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाकळमना येथील पेपरमिलच्या बांबू डेपोला लागलेली आग अद्यापही पूर्णतः आटोक्यात आलेली नाही, या भागात वारा सूरु आहे. या घटनेच्या गांभिर्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधून चर्चा केली.

 आमदार जोरगेवार यांनी आज 23 मे रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचीही भेट घेत आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या आहे.  
     आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी कळमना येथील जळालेल्या बांबु डेपोची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता बोबडे,  सेव्ह फॉरेस्ट संस्थाचे अध्यक्ष सतिश नाईक, विक्रम पंडित, रोहित पंदिलवार, यंग चांदा ब्रिगेडचे शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, राम जंगम, तिरुपती कलगुरुवार यांच्यासह पेपरमिलच्या अधिकाऱ्यांची  उपस्थिती होती.


MLA Kishor Jorgewar had a discussion with Chief Minister Uddhav Thackeray