चंद्रपुरात प्रेम प्रकरणातून तिने पिले ऑल आउट लिक्विड | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, मे ०९, २०२२

चंद्रपुरात प्रेम प्रकरणातून तिने पिले ऑल आउट लिक्विड |

चंद्रपूर पोलिसांनी वाचविले आत्महत्या करणाऱ्या मुलीचे प्राण
चंद्रपूर शहरात प्रेम प्रकरणातून ऑल आऊट लिक्विड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला चंद्रपूर शहरातील रामनगर ठाण्याच्या पोलिसानी तातडीने दखल घेऊन जिल्हा सामान्य रुग्नालयात भरती करून प्राण वाचविले. 

आज दिनांक 9 मे 2022 रोजी नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील डायल 112 कक्ष येथे प्राथमिक संपर्क केंद्र मुंबई यांचेकडून कॉल प्राप्त झाला. चंद्रपूर येथील अंदाजे 21 वर्ष वय असलेली मुलगी हिने प्रेम प्रकरणातून ऑल आउट लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशा माहितीवरून कॉल प्राप्त होताच पोलीस स्टेशन रामनगर येथील चार्ली ड्युटीवर हजर असलेले पोलीस अमलदार परवेश पठाण व मंगेश सायंकार यांना मोबाईल टॅब वर माहिती देऊन तात्काळ घटनास्थळावर पाठविण्यात आले. त्यांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून कोणतेही वाहन उपलब्ध नसताना सदर पीडित मुलीला तात्काळ आपले दुचाकी वाहनावर बसून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती केले. त्यामुळे सदर मुलीचे प्राण वाचले. या बद्दल पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी प्रोत्साहनपर बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याकरिता शुभेच्छा दिल्या. पोलिसांचे या कार्याबद्दल चंद्रपूर शहरातील नागरीकांनी कौतुक केले आहे. love affair in Chandrapur, she got all out liquid
love affair in Chandrapur, she got all out liquid