दुर्गापूर येथे अवघ्या 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; काठीने झुंज देत आईने वाचविले प्राण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मे १०, २०२२

दुर्गापूर येथे अवघ्या 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला; काठीने झुंज देत आईने वाचविले प्राण

बिबट्याच्या हलल्यात बालिका गंभीर जखमी


मागील अनेक महिन्यापासून दुर्गापुरात बिबट्याने दहशत माजवली आहे. मंगळवार दिनांक 10 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास त्याने अवघ्या 3 वर्षीय चिमुकलीला उचलून नेल्याचा प्रयत्न केला. चिमुकल्या मुलीच्या आईने बिबट्या सोबत झुंज करीत आपल्या मुलीला त्याच्या तावडीतून वाचविले. तीन वर्षे आरक्षा जखमी असून, तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

 10 मे रात्री 9 वाजताच्या सुमारास दुर्गापूर वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 वर्षीय आरक्षा जगजीवन पोप्पलवार ही मुलगी अंगणात खेळत असताना अचानक बिबट्याने त्या मुलीवर हल्ला चढविला. आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तिच्या आईने बिबट्या सोबत झुंज केली. हातात काठी घेऊन आपल्या मुलीला वाचवले. यावेळी नागरिकांनी देखील गर्दी केली आणि आरडाओरड झाल्यानंतर त्या चिमुकलीला सोडून पळून गेला दरम्यान आरक्षण तिच्या शरीरावर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
Leopard attack again in Chandrapur;