महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघठनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे १५, २०२२

महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघठनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन

पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष - प्रविण दरेकरमुंबई : गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा चौथा स्तंभ असले पत्रकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत . कोरोना काळात कर्त्यव्य निभावत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला मात्र त्यातील अनेकांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही . पत्रकरांना कोव्हीड योद्धा दर्जा मिळावा यासाठी आम्ही विधिमंडळातही आवाज उठवला आहे मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रविवारी केला .


इंडियन जर्नालिस्ट युनियन या देशव्यापी पत्रकार संगठनेच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघठनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन रविवारी दादर पूर्व मुंबई येथील कोहिनुर हॉल येथे पार पडले यावेळी दरेकर बोलत होते .
यावेळी प्रविण दरेकर यांच्यासह इंडियन इंडियन जर्नलिस्ट युनियन (IJU) चे राष्ट्रीय अध्यक्ष के श्रीनिवास रेड्डी , सरचिटणीस बलविंदर सिंग जम्मू , सचिव नरेंद्र रेड्डी ,  माजी प्रेस कौन्सिल सदस्य एम ए मजीद, तेलंगणा सरचिटणीस  विराट  आली , नवी मुबंई तेलगू कला समितीचे एम कोंडा रेड्डी, आत्मनिर्भर भारतचे रणजित चतुर्वेदी , राजगिरी फाउंडेशनचे अशोक राजगिरी ,  ईटीव्ही भारत ब्युरो चीफ सुरेश ठमके आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने  उपस्थित होते . 
या अधिवेशनात सुरवातीला महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे सरचिटणीस प्रमोद वामन  खरात यांनी संगठनेची भूमिका विशद केली .  संघटनेच्या लोगोचे अनावरण प्रवीण  दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर दरेकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलत असताना आपली सडेतोड मते मांडली , काही पत्रकारही आता एकांगी भूमिका घेऊ लागले आहेत मात्र लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असून त्यांनी कुणा एकाची बाजू न घेता सर्वसमावेशक विचार करून आपली भूमिका निष्पक्षपातीपणे मांडायला हवी असे आवाहन त्यांनी केले तर कोरोनात बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने  भरीव मदत द्यायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली . 
या कार्यक्रमात इंडियन जर्नालिस्ट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष के श्रीनिवास रेड्डी यांनी देशपातळीवर सुरु असलेली पत्रकारांची गळचेपी , पत्रकारांना नसलेले कायद्याचे संरक्षण , मते मांडण्याचे स्वातंत्र्य आणि सध्याची पत्रकारिता यावर मौलिक मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्टेट युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्टचे अध्यक्ष श्रीनिवास गुंडारी हे होते .

The first statewide convention of the Maharashtra State Union of Working Journalists