दोन ट्रकच्या धडकेत भीषण आग; 9 जणांचा मृत्यू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शुक्रवार, मे २०, २०२२

दोन ट्रकच्या धडकेत भीषण आग; 9 जणांचा मृत्यू
चंद्रपूर शहराजवळील अजयपूर जवळ 2 ट्रक ट्रकच्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत 9 जण जळल्याची माहिती पोलिसांनी दिली. 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. आज सकाळी झालेल्या चौकशीत 9 मृतदेह आढळून आल्याचे सांगण्यात आले.

धडके नंतर 2 दोन ट्रकने भीषण पेट घेतला. त्यामुळे चंद्रपूर मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

एक ट्रक हा डीझल टँकर तर दुसरा लाकडाने भरला होता. त्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले होते. अग्निशमन पथकाला सुद्धा घटनास्थळी पोहचायला 1 ते दीड तास लागला. त्यामुळे वाचविण्यात यश आले नाही. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की या अपघातात जळालेले 9 मृतदेह मिळाले आहेत. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही. अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.


The fire broke out in both the trucks; four deaths