२९ मे २०२२
गोदावरी अर्बन वणी शाखेचा पाचवा वर्धापन दिन थाटात संपन्न
वणी :- उत्कृष्ठ कार्य करणारऱ्या दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधींचा सन्मान
वणी :-
सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान दैनिक व आवर्त ठेव प्रतिनिधींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या समाजातील कर्तृत्वान प्रतिनिधींचा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील,अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर तसेच वरिष्ठ व्यवस्थापक रविजी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनात गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा, 5 वा वर्धापनदिन वसंत जिनिंग हॉल वणी येथे दिनांक 27/05/2022 ला मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को ऑप बँकेचे उपाध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, क्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेशजी खुराणा, प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ अर्बन को ऑप बँकेचे संचालक प्रशांत जी मादमशेट्टीवार, कायदेशिर सल्लागार ऍड सुरज महारतळे, रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड संस्थेचे अध्यक्ष संजय जी खाडे, केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखरजी खोंड साहेब, व्यापारी मित्र सहकारी पतसंस्थेचे सचिव पांडुरंग लांजेवार, सामाजिक कार्यकर्त्या निलिमा काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, तसेच दैनिक व आवर्त प्रतिनिधी म्हणून संस्थेच्या वणी शाखेत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधींचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यात सौ हिरल जितेंद्र मुनोत, मनोज लुक्का, सौ. चित्रा विवेक देशपांडे, विजेंद्रजी तातेड, बंडू कडुकर यांचा सन्मान करण्यात आला, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीतील मेंबर्स यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन राजुभाऊ गव्हाणे, प्रास्ताविक वणी शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वणी शाखेतील शाखा व्यवस्थापक विजय मोडक, चंद्रपूर शाखा अधिकारी अनिरुद्ध पाथ्रडकर, सहायक शाखा व्यवस्थापक सुनील चिंचोळकर, कनिष्ठ अधिकारी सौ प्रांजली ठाकरे, सुरज चाटे, तुषार ठाकरे, आतिष बुरेवार, जयवंत ओचावार यांनी प्रयत्न केले तर यावेळी समस्त दैनिक, आवर्त ठेव अभिकर्ता, ठेवीदार उपस्थित होते.
The fifth anniversary of Godavari Urban Wani branch was celebrated
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
