महिला पोलीस कर्मचाऱ्याला वेडसर महिलेने फेकून मारली लोखंडी वस्तू - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, मे ०२, २०२२

महिला पोलीस कर्मचाऱ्याला वेडसर महिलेने फेकून मारली लोखंडी वस्तू

प्रियदर्शनी चौकात महिला पोलीस कर्मचाऱ्याला वेडसर महिलेने फेकून मारली लोखंडी वस्तू
चंद्रपूर शहरातील बस स्थानकाकडून प्रियदर्शनी चौकात येत असलेल्या पुलावरून खाली उतरत असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारली.यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठी दुखापत झाली असून, रक्तस्त्राव झाला आहे. ही घटना 2 मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
दरम्यान प्रियदर्शनी चौकात उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ज्योती कांबळे असे महिला पोलीस कर्मचारी चे नाव असून, त्या जटपुरा गेटकडे जात असताना ही घटना घडली. ही वेडसर महिला नेहमीच वाहनावरून जाणाऱ्या लोकांना वस्तू फेकून मारत असते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. सदर वेडसर महिलेची सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

A female police officer was thrown an iron object by a cracked woman