चंद्रपूर शहरातील जलनगर वार्डात आली हरीण; वन कर्मचाऱ्यांनी जंगलात सुखरूप सोडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२२

चंद्रपूर शहरातील जलनगर वार्डात आली हरीण; वन कर्मचाऱ्यांनी जंगलात सुखरूप सोडलेचंद्रपूर शहरातील जलनगर वार्डात राहणारे भाई सहारे यांच्या घरी चक्क हरीण आल्याने एकच खळबळ उडाली. उन्हाळा लागेल्याने पाण्याच्या शोधात हे हरीण जलनगर येथे आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन कर्माचाऱ्यानी तात्काळ हरणाला तिथून बाहेर काढले.
याबाबत वन्यजीव प्रेमी बंडू धोत्रे यांनी सांगितले की, सदर हरण हे रस्ता भटकल्याने शहरी भागात शिरले असल्याची शक्यता आहे. रस्ता भटकल्याने ही हरण इतरत्र भटकायला लागली. झुडपी किंवा नाल्याच्या मार्गाने हरण शहरात शिरल्याचे ते म्हणाले.

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. उन्हाळा लागला की पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात वन्यप्राणी येत असल्याच्या घटना घडल्या आहेत.

चंद्रपूर वनविभाग चे RRU यूनिट माहिती मिळताच घटनास्थली दाखल झाले. सदर चितळाला सुखरूप पकडून वनक्षेत्रात निसर्गमुक्त केले।आर आर यू टीम मधे यात वनपाल दुपारे, वनपाल पाथर्डे, वनरक्षक भीमराव वनकर, वनरक्षक पठाण, किशोर डांगे यांचा सहभाग होता.


Deer in Jalnagar ward of Chandrapur city; The forest workers left the forest safely