पत्रकार संघाची सडक-अर्जुनी तालुका कार्यकारिणी गठित.अध्यक्षपदी राजेश मुनीश्वर तर कार्याध्यक्ष अशोक इडपाचे. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०६ मे २०२२

पत्रकार संघाची सडक-अर्जुनी तालुका कार्यकारिणी गठित.अध्यक्षपदी राजेश मुनीश्वर तर कार्याध्यक्ष अशोक इडपाचे.संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.

नवेगावबांध:-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सडक अर्जुनी ची नवीन कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली. सडक-अर्जुनी तालुका शाखा पत्रकार संघाची सभा कोहमारा येथील सभागृहात ता. 4 मे ला सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली .
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा सडक-अर्जुनी ची कार्यकारिणी गठित करण्यात आली .संघटनेचे वरिष्ठ पत्रकार भामा चु-हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .यावेळी तालुक्याची कार्यकारणी बिनविरोध घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी राजेश मुनीश्वर ,उपाध्यक्षपदी जितेंद्र चन्ने ,सरचिटणीस मुन्नासिंग ठाकूर , कार्याध्यक्ष अशोक इडपाचे , सहसचिव महेंद्र टेंभरे, कोषाध्यक्ष चंद्रमणी बनसोड ,सांस्कृती प्रमुख युवराज वालदे ,प्रेस फोटोग्राफर योगेश इडपाचे तर संघटक म्हणून भामा चुऱ्हे ,अनिल मुनीश्वर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणा-या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली . संघटनेचा कार्यकाल हा तीन वर्षाचा राहील, असे सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उमराव मांढरे यांनी मानले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पूर्व विदर्भाचे अध्यक्ष पा. महेश पानसे,सरचिटणीस शरद नागदेवे,संघटक डॉ. आनंद शर्मा गोंदिया जिल्हाध्यक्ष राधेशाम भेंडारकर यांनी पत्रकार संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.