नैनपुर जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेतआई व दोन मुलांचा जागीच मृत्यू,वडील गंभीर जखमी. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, मे ०५, २०२२

नैनपुर जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेतआई व दोन मुलांचा जागीच मृत्यू,वडील गंभीर जखमी.संजीव बडोले प्रतिनधी.

नवेगावबांध:राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील देवरी ते नागपूर मार्गातील सडक-अर्जुनी तालुक्यातील नैनपुर गावाजवळ आज ता.५ ला ७ . ३० वाजता झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सदर सविस्तर वृत्त असे की, लाखांदूर तालुक्यातील धरतोडा येथून देवरीकडे जात असतांना आज सायंकाळी ७:३० वाजता  नैनपूर गावाजवळ एका अज्ञात ट्रकच्या धडकेत दोन मुले, पत्नी जागीच ठार झाले. तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्या गंभीर जखमी ला नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. त्यात चिन्मय तुळशीराम मेश्राम वय ६ वर्ष, प्रीती तुळशीराम मेश्राम वय 34 वर्ष तर एक मुलगा बारा वर्षाचा त्याचे नाव कळू शकले नाही. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 45 हे  गंभीर जखमी आहेत. त्यांना नागपूर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. झालेल्या घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचशे मीटर अंतरावर त्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम.एच. 35 डब्ल्यू. 2351 ला फरकडत नेल्याची घटना  आहे. तुळशीराम रामा मेश्राम हे देवरी तालुक्यातील देऊळगाव येथे शिक्षक म्हणून पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. पुढील तपास डूग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.