जांभळी येथे जागतिक मत्स्य चढण दिवस उत्साहात साजरा. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, मे ३०, २०२२

जांभळी येथे जागतिक मत्स्य चढण दिवस उत्साहात साजरा.संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.३० मे:-
आज दिनांक ३० मे  रोज सोमवारला जागतिक मत्स्य स्थलांतरित दिवस साजरा करण्यात आला.मासे हा सर्वांच्या परिचयाचा विषय आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाचे पाणी जेव्हा नदी, नाल्याव्दारे तलाव धरणांमध्ये येतो तेव्हा तलावातील मासे आपल्या अन्नाच्या शोधात व आपली अंडी देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने कळपाने एकत्र येऊन पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तलावाच्या वरच्या भागात जाऊन खड्यात किंवा पाण्याच्या प्रवाहात अंडी सोडतात,याला चढण म्हणतात. या चढणीचा मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, परंतु ही नैसर्गिक क्रिया असल्याने पावसाचे अनियमितपणा व  नद्या नाले ,तलाव यामध्ये  मोठ मोठे उंच धरणे, सांडवे बांधून अशाप्रकारे माश्यांच्या मार्गात मानवाचे हस्तक्षेप वाढल्यामुळे सहजासहजी माशाचे स्थलांतर होतांनी दिसत नाही.त्यामुळे अनेक माशांच्या महत्वाच्या प्रजाती धोक्यात येवून काही प्रजाती नष्टही झाल्या.आपले तलाव, नद्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी माश्यांचे स्थलांतर होणे गरजेचे आहे. स्थलांतरित मासे, लोकं व मुक्त वाहणाऱ्या नद्यांच्यामहत्वाविषयी जागरूकता करण्यासाठी म्हणून जागतिक पातळीवर फिश मायग्रेशन डे या आंतरराष्ट्रीय दिनाचे आयोजन केले जाते. फीड फौंडेशन अर्जुनी व सृष्टी संस्था गडचिरोली , यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नवेगावबांधच्या माध्यमातून आज जांभळी येथील जिल्हा परिषद  शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ८.३० वाजता करण्यात आले होते.आपल्या गोंदिया - भंडारा  या जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव असल्याने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था  व मासेमारी करणारा समाज जास्त प्रमाणात आहेत परंतु माशांची चढण किंवा माशांचे स्थलांतराच्या म्हत्वाबद्दल मत्स्य संस्था व समाजात उदासीनता आहे. फीड फौंडेशनच्या मध्येमातून मागील काही वर्षांपासून या दिनाच्या जाणीव जागृतीचे काम वेगवेळ्या मस्य संस्थानसोबत करत आहे.संस्था व समाज पातळीवरील या बद्दल जाणीव जागरूकता करण्यासाठी गावामध्ये शाळेतील मुलांची रॅली काढून चढणी संबधी नारे देऊन व माशांचे पोस्टर तयार करून समाजात जाणीवजागृतीचे कार्य करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास्थळी विद्यार्थी , मासेमार समाजातील महिला, पुरुष यांना चढण व या दिवसाबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष    कुशनजी ठाकरे यांनी चढणीवरचे मासे पकडल्यास आपल्याला व संस्थेच्या उत्पादनाची कशी नुकसान होते आणि चढणीवरचे मासे नाही पकडले तर उत्पादन कसे वाढविता येईल याबद्द्ल माहित दिली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पतीरामजी तुमसरे हे स्थानिक वनस्पती जाणकार यांनी माशांचे प्रकार व न कोणत्या प्रजातीचे मासे नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत व त्याचे काय कारणे आहेत याबद्दल माहित दिली. या कार्यक्रमाचे संचालन नंदलाल मेश्राम यांनी केले व हे दिवस साजरे करण्याची गरज का पडली या बद्द्ल माहित दिली. तसेच ग्रामपंचायत सदस्य, मत्स्य संस्थेचे सभासद , जलसंवर्धन महिला गट, संजीवनी महिला गटाच्या महिला उपस्थित होत्या, व संस्थेचे कार्यकर्ते दिलीप पंधरे, कविता मौजे, जैवविविधता मित्र जागेश्वर मेश्राम बोंडगाव , झाशीराम मेश्राम सावरटोला आदीउपस्थित होते.अशाप्रकारेजांभळी येथेविद्यार्थ्यांच्या मध्येमातून जागतिक जागरूकता वाढविणार कार्यक्रम घेण्यात आला.