सावरटोला येथे रोहयो कामावर बीजप्रक्रिया मोहीम . - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२५ मे २०२२

सावरटोला येथे रोहयो कामावर बीजप्रक्रिया मोहीम .


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२५मे:-
 मंडळ कृषी कार्यालय नवेगावबांध अंतर्गत कोयंबतूर ५१ या धानाचे सावरटोला ग्रामपंचायत अंतर्गत आज दिनांक २५ मे रोज बुधवारला नरेगाच्या कामावर शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी बहुसंख्य शेतकरी याठिकाणी उपस्थित होते.३ टक्के बीज प्रक्रिया म्हणजे,३०० ग्राम मीठ दहा लिटर पाण्यात घालून ढवळून घ्यावे, त्यामध्ये  आपल्याकडील बियाणे त्यामध्ये टाकायचे. मग वर आलेले फोलपट धानबियाणे बाहेर काढून ठेवायचे.चांगले बियाने वजनदार असल्याने बुडाला बसतात. ते बाहेर काढून २-३ स्वच्छ पाण्याने धुवून सावलीमध्ये वाळवायचे. त्यानंतर त्या धानाला थायरम लावून सावलीत ठेवावे व मग  आपल्याला गादीवाफ्यावर टाकून त्याची नर्सरी तयार करायची. तयार झालेली नर्सरी १० ते १२ दिवसांमध्ये लावणी करायची आहे.लावणी करत असताना सदर धानाचे अंतर हे २५ सेमी×२५ सेमी इतके  अंतर ठेवून एका ओळीत लागवड करायचे आहे. अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आहे.को-५१ या धानाचे बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक  कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. खरीप हंगामापूर्वी ची तयारी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी माती परीक्षणानुसार रासायनिक खताचा वापर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे कृषी विभागाच्या विविध योजना याविषयीची माहिती उपस्थित कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी अर्जुनी मोरगाव चे तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार,मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर, सावरटोला ग्रामपंचायतचे सरपंच युवराज तरोणे,कृषी पर्यवेक्षक विश्वनाथ कवासे, शेतकरी मित्र यादोराव तरोणे, ग्रामपंचायतचे सदस्य तथा गावातील महिला,पुरुष शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.