बोरटोला सावरटोला सोसायटीचे अध्यक्षपदी योगेश लाडे, तर उपाध्यक्ष कृष्णा येरणे. - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

मंगळवार, मे २४, २०२२

बोरटोला सावरटोला सोसायटीचे अध्यक्षपदी योगेश लाडे, तर उपाध्यक्ष कृष्णा येरणे.


संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.२४ मे:-
 विविध कार्यकारी सहकारी संस्था बोरटोलाच्या  आज दि.२४ मे रोज मंगळवारला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संस्थेच्या कार्यालयामध्ये पार पडली.
निवडूण आलेल्या संचालकांमधून योगेश चंद्रकुमार लाडे यांची अध्यक्ष म्हणून तर कृष्णा पांडुरंग येरणे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.याप्रसंगी संचालक डॅनी महादेव डोये, नीता राजेश मेश्राम, वंदना दामोदर हेमने, लक्ष्मण जगन मेश्राम, भाऊराव अंताराम गायकवाड, महादेव शिवा डोये, गुलाब इस्तारी ढोक, विलास नामदेव बोळणे, काशीराम रामा भेंडारकर, वामन गोमा राऊत,राजकुमार डोये असे सर्व संचालक उपस्थित होते.निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलचा मोठ्या फरकाने विजय होऊन,संस्थेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे.हे येथे उल्लेखनीय आहे.