विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१८ मे २०२२

विवेकानंद महाविद्यालयात व्याख्यानमाला संपन्न

शिरीष उगे ( भद्रावती प्रतिनिधी)
       स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात गोंडवाना विद्यापीठाच्या बी. ए. भाग एक व दोन च्या क्रमीक अभ्यासक्रमावर आधारित  सामाजिक परिवर्तन तसेच स्थलांतरण, विस्थापन आणि पुनर्वसन समस्येवर प्रबोधनात्मक व्याख्यानमाला समाजशास्त्र अभ्यास मंडळामार्फत  संपन्न  करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक लोकमान्य महाविद्यालय वरोराच्या सी एच बी प्रा.प्रीती पोहाने हजर होत्या. सदर कार्यक्रमाच्या प्रथम  सत्रात सामाजिक परिवर्तन या विषयावर आधारित व्याख्यानाचे प्रास्ताविक भाषण समाजशास्त्र  विभाग प्रमुख प्रा. अमोल वा.ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन तृप्ती काकडे यांनी केले आणि तनिषा कुटेमाटे या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. 
         सदर व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात प्रीती पोहाने यांनी स्थलांतरण, विस्थापन आणि पुनर्वसन समस्येवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले. स्थलांतरण हे अकस्मात घडून येते, तर पुनर्वसनासाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागतो. असे विचार प्रा. अमोल ठाकरे यांनी प्रातविक भाषणातुन मांडले. या सत्रात  संचालन सुजाता उगे हिने तर पवन चौखेनी आभार मानले.