नवेगावबांध सेवा सहकारी संस्थेवर भाजप सेना प्रणित किसान संस्था विकास पॅनलचा दणदणीत विजय. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१७ मे २०२२

नवेगावबांध सेवा सहकारी संस्थेवर भाजप सेना प्रणित किसान संस्था विकास पॅनलचा दणदणीत विजय.
संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.१७ मे:-
विविध कार्यकारी सहकारी संस्था नवेगावबांध र. नं. 551 च्या सन 2022 ते 27 कार्य काळासाठी दिनांक 15 मे ला घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना प्रणित किसान संस्था विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला. ह्या विरोधात असलेल्या कॉंग्रेस-राॅ. का.प्रणित परिवर्तन पॅनल ला फक्त दोन संचालक निवडून आणण्यात यश आले .
सर्वसाधारण कर्जदार गटामधून जितेंद्र कापगते, अण्णा डोंगरवार, गुलाब डोंगरवार, अशोक हांडेकर ,महादेव बोरकर ,दिलीप पोवळे,खुशाल काशिवार, किसन डोंगरवार विजयी ठरले . महिला राखीव गटामधून विजयाबाई दयाराम कापगते व उर्मिला वेल्हाळ डोंगरवार विजयी झाल्या . भटक्या विमुक्त जाती/ जमाती /विशेष मागास प्रवर्ग गटातून रामेश्वर कोहळे विजयी झाले .अनुसूचित जाती/ जमाती गटामधून खुषालदास मडावी विजयी झाले. तर इतर मागास गटातून शैलेश जायस्वाल हे बिनविरोध निवडूणआले . सदर संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती.या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी आपली संपूर्ण ताकत पणाला लावली होती, मात्र त्यांना आपला एकही प्रतिनिधी निवडून आणता आला नाही.तर दोन संचालक निवडून आल्याने कॉंग्रेसला पक्षाला आपली प्रतिष्ठा राखता आली. सदर निवडणुकीच्या दिवशी माजी आमदार स्व. दयाराम भाऊ कापगते यांची पुण्यतिथी असल्याने भाजप सेना प्रणीत पॅनलने आपला हा विजय श्रद्धांजली म्हणून त्यांना अर्पित केला. निवडणूक निर्णय अधिकारी संदीप बोरले यांच्या टीमने चोख पोलीस बंदोबस्तात सदर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.