मनसे व्यापारी सेनेच्या उपाध्यक्ष पदी श्री शाम पूनियानी यांची नियुक्ती - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, मे ३०, २०२२

मनसे व्यापारी सेनेच्या उपाध्यक्ष पदी श्री शाम पूनियानी यांची नियुक्ती


*गेल्या अनेक वर्षापासून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या सानिध्यात राहून पक्ष कार्य करणारे श्री श्याम पूनियानी यांची आदरणीय राजसाहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष श्री यशवंत किल्लेदार यांनी व्यापारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांचे कार्यक्षेत्र पूर्व विदर्भ राहणार आहे.

Appointment of Shri Sham Pooniyani as Vice President of MNS Vyapari Sena


*नागपुरातील व्यापारी भाग असलेल्या इतवारी, गांधीबाग, मस्कासाथ या भागाशी ते विशेष परिचित असून त्या भागातील व्यापारी बंधूंच्या समस्या बाबत त्यांना सखोल माहिती आहे,या दिलेल्या महत्वपूर्ण जवाबदारी बद्दल त्यांनी पक्षाचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे, राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी, व्यापारी सेनेचे अध्यक्ष श्री यशवंत किल्लेदार, व्यापारी सेनेचे उपाध्यक्ष (प्रशासन) श्री मितेश दवे, यांचे आभार मानले आहेत व दिलेली जवाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाला अपेक्षित कार्य सर्व मनसे पदाधिकारी आणि व्यापारी बंधूंच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करू व जास्तीत जास्त व्यापारी बंधू मनसेशी जोडण्याचा प्रयत्न करू असा विश्वास श्याम पूनियानी यांनी व्यक्त केला.

नागपूर शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे तसेच नागपूर शहर व ग्रामीण भागातील मनसे पदाधिकारी यांनी शाम पूनियानी यांचे याप्रसंगी अभिनंदन करून व्यापारी सेनेच्या पुढील कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.