पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ चंद्रपूरात मोदींच्या फोटोपुढे आरती करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, मे २१, २०२२

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ चंद्रपूरात मोदींच्या फोटोपुढे आरती करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

चंद्रपूर :- 
देशात पेट्रोल, डिझेल व गॅसची सातत्याने दरवाढ होत असून या दरवाढी मुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या वतीने निवडणुकांपूर्वी वेळोवेळी महागाई कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचा केंद्र-शासनाने विश्वासघात केला आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ कमी व्हावी याकरिता वेळोवेळी अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले परंतु सर्वसामान्य जनतेने केलेल्या आंदोलनाचा केंद्र शासनाला काहीही फरक पडला नाही, याउलट जेवढे आंदोलने झाली त्यापेक्षा जास्त व अधिक दरवाढ करण्यात आली.

व म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करण्याच्या उद्देशाने आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या फोटोची आरती करून साकडे घालण्यात आले. शहरातील पेट्रोल पंप परिसरात असलेल्या मा. नरेंद्र मोदींच्या फोटो पुढे मोदीजींनी सांगितलेल्या उपदेशाचेच अनुकरण करीत थाळी व ताळी वाजवून फुले वाहत आरती केली व महागाई कमी करण्याचे साकडे घालत पेट्रोल भरणाऱ्यांना प्रसाद म्हणून साखर वाटत अभिनव आंदोलन केले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील भाऊ काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, शहराध्यक्ष कोमिल मडावी, विधानसभा अध्यक्ष आकाश निरठवार, जिल्हा उपाध्यक्ष सूर्या अडबाले, शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, सतीश मांडवकर, पंचायत समिती सदस्य पंकज ठेंगारे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, संदीप बिसेन, नितीन घुबडे, ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नाडे, अंकित धेंगारे, रोशन शेख, हेमंत गुंजेकर, सिहल नगराळे, केतन जोरगेवार, अक्षय सगदेव, चेतन अनंतवार, सौरभ घोरपडे, शुभम आंबोदकर, कपिल उईके, मुन्ना ठेंभुरकर, प्रतीक भांडवलकर, पवन मेश्राम, मनोज गेडाम, शिवराज पाटील, पंकज मेंढे, गोलू साखरकर, चिंटू जुनघरे, धर्मा नैताम यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.