आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२२ येत्या मंगळवारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ मे २०२२

आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२२ येत्या मंगळवारी


 चंद्रपूर:
विश्व संवाद केंद्र, चंद्रपूर विभाग द्वारे आयोजित आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती समारोह-२०२२ येत्या मंगळवारी दिनांक२४-०५-२०२२ ला सायंकाळी ठीक ५.०० वाजता प्रत्यक्षात शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, रामाळा तलाव रोड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ पत्रकार मा. श्री. सुधीर जी पाठक , नागपूर, हे प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे.

 तर अतिथी म्हणून चंद्रपुरातील प्रसिद्ध लेखक मो.बा.देशपांडे हे असतील. सदर कार्यक्रमात चंद्रपुरातील वृत्तपत्र मालक यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू, लेखक, साहित्यिक, नाटककार, वृत्तपत्रछायाचित्रकार व समस्त नागरिकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्षात सहभागी व्हावे. असे आवाहन विश्व संवाद केंद्र चंद्रपूर विभाग तर्फे करण्यात येत आहे.