चंद्रपूर:बल्लारपूर पेपरमिलच्या कळमना बांबू डेपोला भीषण आग:कोट्यावधींचे नुकसान - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे २२, २०२२

चंद्रपूर:बल्लारपूर पेपरमिलच्या कळमना बांबू डेपोला भीषण आग:कोट्यावधींचे नुकसान

चंद्रपूर:
बल्लारपूर कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली. या आगीत डेपात ठेवण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचे बांबू व निलगिरीचे लाकूड जळून खाक झाले. दरम्यान, आग कश्यामुळे लागली हे कळू शकलेले नाही. बांबू डेपोच्या जवळच पेट्रोल पंप देखील आगीच्या विळख्यात आल्याची माहिती आहे.

या डेपोतून साठविलेला कच्चा माल बल्लारपूर पेपरमिलला पाठविण्यात येतो. रविवार दुपारी २ ते ३ च्या सुमारास दरम्यान अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. यात कोट्यावधी रुपयांचा बांबू, निलगिरीचा माल जळाला . डेपोला आग लागताच बल्लारपूर पोलिसांना कळविण्यात आले. सोबतच अग्निशमन दलाच्या पथकाने घटना स्थळावर दाखल होऊन आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या गडचांदूर, नारंडा, मूल राजुरा, चंद्रपूर, येथून दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशीर झाला व डेपो जळून खाक झाला.

बल्लारपूर वन परीक्षेत्रातील लावारी कळमना  जंगलात सकाळपासून वणवा भडकला होता अशी माहिती होती. जंगल जळत जळत डेपोपर्यंत आले असावे असा अंदाज आहे . त्याचीच झड डेपोला लागली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीच्या भयंकर भीषण झळाचे लोट उसळत होते. धुरांचे लोट निघत असल्याने संपूर्ण परिसर धुराने झाकला होता . महामार्गावरील ट्राफिक देखील थांबविण्यात आली होती.नेमकी आग कशामुळे लागली याबाबाद अद्यापही माहिती नाही . याबाबद चौकशी नंतर समजेल.