अष्टभुजा वार्ड चंद्रपुर येथील खुनातील मुख्य सुत्रधार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, मे २५, २०२२

अष्टभुजा वार्ड चंद्रपुर येथील खुनातील मुख्य सुत्रधार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

शहरातील अष्टभुजा वार्डात
25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास रोडवर असलेल्या अष्टभुजा वार्डात एका 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना आज 25 मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

 
दिनांक 24/05/2022 चे रात्रौ 10:30 वा ते 11:10 वा च्या सुमारास चंद्रपुर शहरातील अष्टभुजा वार्डातील परिसरात एका इसमाचा तीन आरोपीतांनी मिळुन पुर्वीच्या वैमण्याश्यातुन धारधार शस्त्राने भोसकुन निघून खुन केला व आरोपी पसार झाले . सदर बाबत पो.स्टे . रामनगर येथे अप.कं. 543 / 2022 कलम 302,34 भादंवीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी चेतन उर्फ सचिन सोनवणे हा मोरवा विमानतळ परिसरात जंगलामध्ये लपुन बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली . 

त्यावरुन ते स्वतः पथकासह सदर परिसरात जावुन सापळा रचुन त्याचा शोध घेण्यात आला . सदर परिसरात सदर आरोपी दिसुन आला . याला शिताफिने ताब्यात घेतले .

 सदर आरोपी देखील सदर गुन्हयात जख्मी झालेला आहे . त्याची वैद्यकिय तपासणी करुन रामनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे , अपर पोलीस अधीक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व स्थानिक गुन्हे शाखा शोध पथकातील पोहवा संजय आतकुलवार , नापोकॉ दिपक डोंगरे , पोकॉ प्राजल झिलपे , गणेश भोयर , चानापोकॉ चंद्रशेखर आसुटकर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली .