मनपा निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा - सर्वोच्च न्यायालय - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, मे ०४, २०२२

मनपा निवडणुका 2 आठवड्यात जाहीर करा - सर्वोच्च न्यायालय

आठवड्यात निवडणुका जाहीर करा - सर्वोच्च न्यायालय


नवी दिल्ली : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाने येत्या दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणावरील (OBC Political Reservation Case) अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत.

Announce Municipal Elections in 2 Weeks - Supreme Court