चंद्रपुरात येत्या 14 जून रोजी संत कबीर महोत्सव - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

रविवार, मे २२, २०२२

चंद्रपुरात येत्या 14 जून रोजी संत कबीर महोत्सव

मृणालगिरी" हॉल, खोब्रागडे कॉम्प्लेक्स येथे संत कबिर महोत्सवाच्या आयोजनासाठी समितीची बैठक संपन्न

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात येत्या 14 जून रोजी संत कबीर महोत्सव आयोजित करण्यात आला असून, नियोजनासाठी आयोजन समितीची बैठक आज दिनांक 22 रोजी सायंकाळी मृणालगिरी" हॉल, खोब्रागडे कॉम्प्लेक्स येथे पार पडली.


संत कबीर महोत्सवाचे यशस्वीतेसाठी, कृती नियोजन करण्या करिता व विविध समित्या गठीत करण्याकरिता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज २२ मे २०२२ रोजी सायकाली " मृणालगिरी" हॉल, खोब्रागडे कॉम्प्लेक्स, जयंत टॉकीज समोर, मेन रोड, चंद्रपूर बैठक पार पडली. यावेळी हिराचंद बोरकुटे, प्राध्यापक खोब्रागडे, प्राध्यापक इसादास भडके, आनंद अंगलवार यासह चंद्रपूर शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती.


Sant Kabir Festival on 14th June in Chandrapur