जिल्हा परिषद , चंद्रपूर अंतर्गत पदभरती संदर्भात महत्वपूर्ण माहिती zp Chandrapur - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, एप्रिल ११, २०२२

जिल्हा परिषद , चंद्रपूर अंतर्गत पदभरती संदर्भात महत्वपूर्ण माहिती zp Chandrapur

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , जिल्हा परिषद , चंद्रपूर अंतर्गत पदभरती संबंधाने सुचना क्र.४
जाहिरात क्र.१ (सन २०२१-२२) (दि.२१.०२.२०२२)चे अनुषंगाने उमेदवारांकरीता सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियान , चंद्रपूर अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरतीबाबत प्रकाशित केलेल्या जाहिरातीचे अनुषंगाने या कार्यालयाकडे प्राप्त अर्जांनुसार उमेदवारांची पात्र व अपात्र यादी दि.२३.०३.२०२२ रोजी प्रकाशित करण्यात आली. सदरची यादी फक्त छाननीअंती अर्ज पात्र / अपात्र असणा - या उमेदवारांची यादी असुन यावर उमेदवारांस काही आक्षेप घ्यावयाचा असल्यास तसे फक्त लेखी अर्ज तयार करुन दि.२४/०३/२०२२ ते २८/०३/२०२२ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत कार्यालयाकडे मागविण्यात आले . त्यानुसार प्राप्त आक्षेपांची पडताळणी करुन आक्षेप निकाली काढणेकरीता गठीत समिती समक्ष प्राप्त आक्षेप अर्जानुसार पदांकरीता सादर केलेल्या मुळ अर्जांची छाननी करून आक्षेप निकाली काढणे तसेच पुढील आवश्यक प्रक्रिया दि.१३/०४/२०२२ रोजी करण्यात येत आहे . सबब वरील प्रमाणे दिलेल्या कालावधीमध्ये पात्र / आपात्र यादीवर आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना सुचित करण्यात येत आहे की , त्यांनी यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय , टिबी रुग्णालय परिसर , शासकिय वैद्यकिय महाविद्यालय जवळ , रामनगर चंद्रपूर या कार्यालयात हजर रहावे . आक्षेप घेतलेले जे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांचे आक्षेपांवर समितीने घेतलेले निर्णय अंतिम राहतील , याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी .

१)Specialist
२)Medical Officer , Dental
३)Medical Officer AYUSH ( PG )
४)Medical Officer AYUSH ( UG )
५)Psychologist
६)Audiologist
७)Psychiatric Nurse
८)Physiotherapists
९)Counselor
१०)Para Medical Worker
११)Pharmacists
१२)Dialysis Technician
१३)X - Ray Technician
१४)Supervisor - Field Level Monitors
१५)TB Supervisor - STS
१६)Staff Nurse

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक ,
एनएचएम , चंद्रपूर