वन तलावाजवळ सापडला सॅटेलाईट अवशेष - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, एप्रिल ०६, २०२२

वन तलावाजवळ सापडला सॅटेलाईट अवशेष


चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रह्मपुरी तालुक्यात विविध ठिकाणी सॅटॅलाइटचे अवशेष आढळले. आज सकाळी चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रात अंतर्गत तळोधी बीटातील कक्ष क्रमांक 45 मधील वन तलावाजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, आपल्या सहकार्यासह नियमित गस्त घालीत असताना तलावात विचित्र अशी वस्तू दिसल्याने त्याला बाहेर काढले असता जिल्ह्यात सध्या चर्चेत असलेल्या सॅटलाईट चे अवशेष असल्याचे समजले. त्यानी ही माहिती चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांना देऊन हा अवशेष त्यांच्या कडे सोपविला. सद्यास्थितीत हा अवशेष चिमूर पोलीस स्टेशन इमारतीमध्ये ठेवण्यात आला असून, अंतराळ विभागातील तज्ञ आल्यानंतर त्यांचे कडे हा अवशेष सोपविण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सांगळे यांनी दिली आहे…
One more metal ball found in khadsangi buffer zone of Tadoba andhari tiger reserve today. @isro @etadoba @MahaForest @moefcc @ntca_india administration still insensitive about this metal rain. not any specific scientists visit n investigate till [email protected] @CMOMaharashtra https://t.co/QO3OGwCtnc