९ एप्रिलपासून कौन बनेगा करोडपती रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार | Registration for Kaun Banega Crorepati - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०२ एप्रिल २०२२

९ एप्रिलपासून कौन बनेगा करोडपती रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार | Registration for Kaun Banega Crorepatiअनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). येत्या काही महिन्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्यान व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सोनी टेलिव्हिजन वाहिनीने या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची नुकतीच घोषणा केली आहे. येत्या 9 एप्रिलपासून या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. मग रात्री 9 वाजता नक्की वेळ काढून ठेवा.Registration for Kaun Banega Crorepati will start from April 9या कार्यक्रमाच्या 14 पर्वाचे होस्ट बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. नुकतेच सोनी टेलिव्हीजन वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 14 व्या पर्वाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन प्रेक्षकांना प्रोत्साहन देत आहेत.


Registration for Kaun Banega Crorepati will start from April 9