पाणी पुरवठा योजनेतील योगेश समरीत या कंत्राटदारांकडून थकीत वसूल करा : दीपक जयस्वाल यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०१ एप्रिल २०२२

पाणी पुरवठा योजनेतील योगेश समरीत या कंत्राटदारांकडून थकीत वसूल करा : दीपक जयस्वाल यांची मागणी

चंद्रपूर | शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून नोव्हेंबर 2019पूर्वी खाजगी कंत्राटदाराच्या मार्फतीने पाणी पुरवठा करण्यात येत होता. उज्वल कंट्रक्शनचे योगेश समरीत यांच्याकडे सहा कोटी 75 लाख रुपयांची थकीत असून, ती वसूल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केली आहे.

चंद्रपूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अकरा वर्षे खासगी कंत्राटदाराच्या मार्फतीने योजना राबविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गुरुकृपा आणि त्यानंतर उज्वल या कंपनीकडे काम देण्यात आले होते. चंद्रपूर शहरात सुमारे 32 हजार 250 नळकनेक्शन असून, त्यांच्या वसुलीची जबाबदारीदेखील कंत्राटदाराकडे होती. मात्र पाणीपुरवठा योजनेमध्ये गैरसोय आणि हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर महानगरपालिकेने कंत्राट रद्द करून ही योजना आपल्या ताब्यात घेतले. दरम्यान उज्वल कन्ट्रक्शनचे योगेश समरित यांच्याकडे 6 कोटी 75 लाख रुपयांची थकीत असून, ती वसूल करण्यात यावी, त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी केली आहे.Recover arrears from these contractors in water supply scheme Yogesh Samrit: Demand of Deepak Jaiswal