जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटी अध्यक्षपदी राजेंद्र टण्णू | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

बुधवार, एप्रिल १३, २०२२

जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटी अध्यक्षपदी राजेंद्र टण्णू |

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटीची वार्षिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,त्यामध्ये अध्यक्षपदी राजेंद्र टण्णू तर कार्याध्यक्षपदी संजय ताजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवाई देवी यात्रा २ ते ४ मे या कालावधीत साजरी होणार आहे,यात्रा कमिटीच्या बैठकीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे उपाध्यक्ष विनायक गोसावी,सलिम मुलाणी,खजिनदार रुपेश जगताप,सह खजिनदार अभिषेक शिंदे,सेक्रेटरी सुमित लांडे सह सेक्रेटरी मुकेश जाधव युवा संघटक सौरभ वर्पे, सल्लागार भरत मते,चंद्रशेखर गाजरे,विश्राम अखडमल, राजेंद्र खत्री,बिहारीलाल परदेशी, सचिन गिरी,संजय वरुडे, विक्रम कुरहे,दत्तात्रय पानसरे,कन्हैया खोत कायदेशीर सल्लागार कैलास गोसावी,वैभव परदेशी प्रसिद्धी प्रमुख योगेश जोशी,जितेंद्र पुराणिक यांचा समावेश आहे तीन दिवस यात्रेत विविध धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक, मनोरंजन पर कार्यक्रम आयोजित केले आहे अशी माहिती शिवाई देवी सेवा संस्थेचे अध्यक्ष शामसिंग खोत यांनी दिली.


Rajendra Tannu as the Chairman of Junnar City Shivai Devi Yatra Committee