चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिरातून निघाली रामनवमी निमित्त शोभायात्रा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१० एप्रिल २०२२

चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिरातून निघाली रामनवमी निमित्त शोभायात्रा
भारतीय संस्कृती व एकतेचे प्रतिक असणारी प्रभू श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे भव्य-दिव्या स्वरूपात श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने १० एप्रिल दुपारी ४.०० वाजता श्री काळाराम मंदिर, समाधी वार्ड येथून मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघाली.

श्री रामनवमीनिमित्त चंद्रपूर येथील काळाराम मंदिरातुन प्रभु श्रीरामचंद्रांची शोभायात्रा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाली.

या शोभायात्रेत विविध प्रभागातून अनेक देखावे, भजन मंडळ सहभागी झाले होते. ही शोभायात्रा काळाराम मंदिर येथून पठाणपुरा रोड, गांधी चौक जटपुरा गेट, गिरणार चौक आदी ठिकाणी गेली. तिथे अनेक नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत पूजा केली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेमध्ये शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रभुंची विधीवत पुजा केली. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, महानगर भाजपा अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, नगरसेविका सौ. संगीता खांडेकर, श्री. भागवताचार्य मनिष महाराज, श्री. उपाध्‍याय , सौ भारती दुधानी, सचिन काटेपल्लीवार, 
 श्री विनोद उपाध्याय, घनश्याम दरबार, वसंत थोटे, श्री हरीशचंद्र अहिर, योगेश भंडारी, शैलेश बागला, मधुसुधन रुंगठा, दिनेश बजाज, हसमुखभाई ठक्कर, राजगोपल तोष्णीवाल, ब्रीजगोपाल मंत्री यांची उपस्थिती होती.

 शहरातून निघालेल्या शोभायात्रेचे संचालन करण्याचे नियोजन करण्यात आले. शोभायात्रा हि धर्ममय, भक्तीमय, भव्यदिव्य आणि शिस्तबद्ध होती. शोभायात्रा मध्ये सर्व मठ मंदिर, सामाजिक संस्था, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, व्यापारी संघटन, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल, यंग चांदा ब्रिगेड,  भारतीय जनता युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कमाल स्पोर्टिंग क्लब, जगदंब ग्रुप, शिवछत्रपती प्रतिष्ठान, विश्वकर्मा जांगीड समाज, महावीर समाज, प्यार फाऊनडेशन,  हिंदी ब्राम्हण समाज, राजस्थानी ब्राम्हन समाज, पंजाबी समाज सेवा समिती , चर्मकार समाज, सुदर्शन समाज, तेली समाज, कुनबी समाज, आर्य वैश्य कोमटी समाज, सोनार समाज, सिंधी समाज, क्षत्रिय स्वर्णकार महिला मंडळ, अग्रवाल समाज, जैन समाज व सर्व समाजातील युवा संघटन, सांस्कृतिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी  देखील सक्रीयपणे सहभागी होते.