२७ एप्रिल २०२२
Home
महाराष्ट्र
ओबीसी नेते सचिन राजूरकर यांनी व्यक्त केले दुःख; फेसबुक पोस्ट मध्ये काय लिहिले वाचा |
ओबीसी नेते सचिन राजूरकर यांनी व्यक्त केले दुःख; फेसबुक पोस्ट मध्ये काय लिहिले वाचा |
प्रिय ओबीसी बांधव,
जय ओबीसी!
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख वाटत आहे की, आपण ज्या ओबीसी समाजात राहतो त्या समाजाबद्दलचा जिव्हाळा व त्याची जाणीवच आपल्याला झालीच नाही.
फक्त आपल्या पुरतीच स्वार्थासाठीच जाणिव झाली असे म्हणावे लागेल.बंधुंनो,आम्ही शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पदोन्नतीसाठी,मुलांच्या शिक्षणासाठी संबंधित अधिका-यांकडून ओबीसीचे दाखले घेतले.त्यातून आपला स्वतःचा फायदा म्हणून. ओबीसी प्रवर्गातून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ,प्राचार्य, डॉक्टर, तहसिलदार, सचिव, शिक्षक कारकुन,इंजिनिअर, इन्स्पेक्टर, पोलीस व इतरही पदावर नोकरी मिळाली, यावर आपला परिवार सुखरुप केला.निवृत्तही झालो.काहीजण आजही नोकरीवर आहेत व ओबीसीच्या प्रवर्गातुन हक्काने आपल्या मागण्या मागतात. एवढेच नाही तर मुलांच्या शिक्षणासाठी काही सवलती मिळवून मुलांना शिक्षणही देत आहेत.काही राजकारणी ओबीसीतून निवडणूक लढवून पदे भोगलीत ,भोगतही आहेत पण या सर्वांना मात्र ओबीसीचा विसर, पुढच्या पिढीसाठी विसरच पडला. फक्त सांगण्यासाठीच 52% आहोत काय?
आपण असेच राहलो तर ओबीसी समाजातील जनतेला याच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव ओबीसी बांधवांनी ठेवने गरजेचे आहे. आता आपण आपल्या ओबीसी आरक्षणाचा कोटा वाचवण्यासाठी व ईतरही मागण्या पुर्ण करण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्रित येणे प्रत्येक ओबीसी बांधवाची गरज आहे. विशेष करून तरुण यूवक व युवतींनी कारण त्यांच्या करिताच हा लढा आहे.मागे मेगा भरती रद्द, व आता लोकसेवा आयोगाच्या परीक्षा रद्द होण्यासाठी दडपण टाकले जात आहे व धमकी पण दिली जात आहे.मेगा भरती झाली असती तर कितितरी ओबीसी बांधव आज नोकरीवर असते.याची जाणीव ठेवा. आणि लढण्यासाठी तनमनधनाने एकत्र या.
ही लढाई माझ्यासाठी नसून इतरांसाठी आहे ही भावना असू द्या ही सर्व बांधवांना विनंती.
फक्त वाचून डीलिट न करता यावर चिंतन करा. *सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ*
*जय ओबीसी
🙏👍🙏👍🙏👍🙏🙏
OBC leader Sachin Rajurkar expressed grief; Read what was written in the Facebook post
खबरबात
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.
- प्रकाशक
ईमेल [email protected]
[email protected]
