नागपूर पोलिसांनी पटकावला सर्वोच्च पोलिसिंगचा सन्मान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


११ एप्रिल २०२२

नागपूर पोलिसांनी पटकावला सर्वोच्च पोलिसिंगचा सन्मान

नागपूर: 
वेळेवर,कमी दिवसात, गुन्ह्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण गुन्हेगारीवर नियंत्रण, साबूत ठेवण्यात  राज्यात नागपूर पोलिस अव्वल ठरले आहे. अर्धवार्षिक गुन्हे आढावा परिषदेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना चषक व प्रशस्तीपत्र देऊन नागपूर पोलिसांचा गौरव करण्यात आला.

२०२०मध्ये नागपूर पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक गुन्ह्यांचा छडा लावला. कुख्यात गुंडांच्या टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले. करोना काळात मृत झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासह पोलिसांची वैद्यकीय तपासणी करून करोनापासून बचावासाठी त्यांना आवश्यक ती औषध व सुविधा पुरविण्यातही नागपूर उत्तम ठरले. 

राज्यातील सर्वच मुख्यालयांतून या बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. 'ब' गटात नागपूर शहर पोलिसांनी यात प्रथम स्थान पटकावले आहे. पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जबाबदारी आणखी वाढवी : आयुक्त

'हे सांघिक यश आहे. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमानेच नागपूर पोलिसांना हे स्थान मिळाले. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे', अशा शब्दांत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी भावना व्यक्त केल्या.