दगडाने डोके ठेचून केली दोघांची हत्या | - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

गुरुवार, एप्रिल १४, २०२२

दगडाने डोके ठेचून केली दोघांची हत्या |गडचिरोली ( Gadchiroli):  एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील हेडरी पोलिस उपविभागांतर्गत गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी दोन युवकांची दगडाने डोके ठेचून हत्या हत्या केली. अशोक नरोटे(२८ रा.गोरगुट्टा)  व मंगेश हिचामी (२७रा.झारेवाडा) अशी मृतांची नावे आहेत. नक्षल्यांनी केलेल्या हत्या मधील एक ग्रामस्थ मंगेश हिचामी हा झारेवाडा येथील असून, अशोक नरोटे हा आत्मसमर्पित नक्षलवादी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस मदत केंद्र (Police) गट्टा (जां) हद्दीमध्ये दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी मंगेश मासा हीचामी (२७ ) रा. झारेवाडा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली जि. गडचिरोली व नविन पेका नरोटे (२५) रा. गोरगुट्टा पो. गट्टा (जां) ता. एटापल्ली या दोन निरपराध आदिवासी युवकांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी क्रुर हत्या केली.


नक्षलवाद्यांनी मंंगेश हिचामी यास दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी रात्रो १०.०० वाजता व नविन नरोटे यांस रात्रो ०१.००  वाजता घरातुन बळजबरीने घेवुन गेले व त्यांची हत्या केली. या दोघांच्याही हत्येनंतर मंगेश हिचामी याचे मृतदेह झारेवाडा ते गट्टा रोडवर आणुन ठेवले तर नविन नरोटे याचे मृतदेह गोरगुट्टा ते गिलनगुडा रोडवर आणुन ठेवले होते.

या दोघांचे मृतदेह त्यांच्या गावापासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. बंदुकीने त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हेडरी पोलिस ठाण्याजवळच सुरजागड पहाड असून, तेथे लोहखनिज उत्खननाचे काम सुरु आहे. काल १३ एप्रिल रोजी दुपारी २.०० वाजताच्या  सुरजागड लोहखनिज प्रकल्पात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठ्या थाटामाटात कार्यक्रम करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या २४ तासाचा आधीच नक्षल्यांनी दोघांची हिंसक हत्या करून दहशत निर्माण करून पोलीस प्रशासनात खळबळ माजवली असून नक्षल पुन्हा सक्रीय झाले असून सुरजागड लोह प्रकल्पावरून कठीण परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच सुरजागड परिसरात मोठ्या संख्येने नक्षल विरोधी तुकड्या पाठवून सर्च ऑपरेशन नक्षल विरोधी अभियान तिव्र केल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून समोर येत आहे.


Murder Gadchiroli Etapalli

Gadchiroli, Maharashtra 442605, India