वेकोलीच्या दुर्गापूर परिसरात हल्लेखोर बिबट अखेर जेरबंद - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल ०९, २०२२

वेकोलीच्या दुर्गापूर परिसरात हल्लेखोर बिबट अखेर जेरबंद
दुर्गापूर परिसरात समता नगर परिसरात बिबट्याने प्रतीक शेषराव बावणे आठ वर्षीय बालकाला उचलून नेऊन ठार केले होते. त्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वेकोली परिसरात आज 9 एप्रिल रोजी पहाटे च्या सुमारास हा बिबट जेरबंद झाला.

30 मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दुर्गापूर परिसरात समता नगर परिसरात बालक खेळत असताना बिबट्याने उचलून नेले. बालकाला फरफटत जंगलात नेऊन त्याचे मुंडके धडावेगळे केले होते.
या घटनेनंतर नागरिकांनी उपक्षेत्रीय कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे आणि त्यांच्या पथकाने या परिसरात पिंजरे लावले होते. सतत आठ दिवसापासून या भागांमध्ये गस्त सुरू होती. आज नऊ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
आज पहाटे शक्तिनगर वेकोली परिसराजवळ वनविभागकडुन लावण्यात आलेल्या पिंजरा मध्ये बिबट जेरबंद झाला आहे शक्तिनगर , दुर्गापुर नेरी कोंडी व वेकोलीच्या परिसरात बिबट समस्या असल्याने सदर बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याने पिंजरे लावण्यात आलेले आहेत आज दिनांक 9 एप्रील रोजी पहाटेच्या वेळेस शक्तिनगर लगतच्या भागात लावण्यात आलेल्या पिंजरामध्ये बिबट अडकला सदर बिबटयास त्वरीत ट्रांजीट ट्रिटमेंट सेंटरला हलविण्यात आले असुन पशुवैदयकीय अधिकारी कडुन तपासणी केली जाईल यांनतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे वनविभागाने कळविले आहे माहीती मिळताच चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी , प्रशांत खाडे वनपरिक्षेत्र अधिकारी , राहुल कारेकर , राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य , बंडु धोतरे घटनास्थळी भेट दिली चंद्रपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या दुर्गापुर नियतक्षेत्रातील वेकोली दुर्गापुर व आजबाजुच्या क्षेत्रात मागील दोन महीन्यापासुन मानव वन्यप्राणी संघर्षाच्या घटना घडत असुन येथे बिबट समस्या अधिक आहे बिबटचा वावर लगतच्या ग्रामपंचायत व वेकोली वस ाहतीमध्ये आहे . याच दरम्यान दिड महिन्याच्या कालावधीत या परिसरात दोन मनुष्यहानीच्या घटना घडल्याने परिसरात भितीचे व तणावाचे वातावरण होते . त्यामुळे वनविभागाने वरिष्ठ कार्यालयाकडुन परवानगी घेत बिबट जेरबंद करण्यास पावले उचलली होती ठिकठिकाणी बिबट जेरबंद करण्यास पिंजरे लावण्यात आले होते . सोबतच वनकर्मचारी यांची दिवस रात्र गस्त , वन्यप्राणी मागोवा , व्यापक जनजागृती व वेकोली कडुन झुडुप स्वच्छता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे . संबधीत सर्व विभागाकडुन आवश्यक कामे त्वरीत करण्याची गरज असल्याचे तसेच परिसरातील नागरीकांनी दक्षता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे मत विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी सुचना केल्या आहेत . परिसरातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्यास तसेच बिबट जेरबंद करण्याची मोहीम विभागीय वनाधिकारी , प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहायक वनसरंक्षक , निकीता चौरे , आर.एफ.ओ. राहुल कारेकर याकामी निरंतर प्रयारत असलेले वनविभागाचे कर्मचारी वनपाल तावाडे वनपाल गोजे वनपाल वासेकर , वनरक्षक दहेगांवकर उमरे , बैनलवार चंद्रपूर आर . आर.यु. पथकचे वनपाल धोडरे दुपारे वनरक्षक वनकर खांदवे , शेडमाके वनमजुर पोईनकर डांगे , रायपुरे , चहांदे पडगेलवार आदी सर्व वनकर्मचारी सातत्यपुर्ण परिश्रम घेत आहेत . Leopard Chandrapur wcl Durgapur
Prashant khade, Divisional Forest Officer, Maharashtra India
Western coal Fild India