नागपुरात मनसेने उत्साहात साजरी केली हनुमान जयंती : भक्तिमय जल्लोषात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल १६, २०२२

नागपुरात मनसेने उत्साहात साजरी केली हनुमान जयंती : भक्तिमय जल्लोषात महाआरती आणि हनुमान चालीसा पठण


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक सरसावले असून आज श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधत विविध भागात मनसे पदाधिकाऱ्यांनी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला.


*सोनेगाव तलाव परिसरातील श्री हनुमान मंदिर येथे सकाळी मनसेच्या दक्षिण - पश्चिम विभागातील कार्यकर्त्यांनी भक्तिमय जल्लोषात महाआरती करून श्री हनुमान चालीसाचे शंखनाद करीत सामूहिक पठण केले.*मनसे प्रदेश सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांच्या हस्ते श्री हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. मनसे शाखा अध्यक्ष शिरीष पटवर्धन गुरुजी यांनी मारुती स्त्रोत म्हणत विधिवतरित्या श्री हनुमंताची पूजा पार पाडली*
*महाबली हनुमान की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय,असा जयकारा करीत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारुती मंदिराच्या प्रांगणात बसून श्री हनुमान चालीसाचे पठण केले.


श्री हनुमंताच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी मनसेच्या महाआरती व सामूहिक हनुमान चालीसा पठण मध्ये आनंदाने सहभाग नोंदविला. याप्रसंगी मनसे तर्फे येणाऱ्या भाविकांसाठी लस्सी व थंड ताक वितरीत करण्यात आले.


श्री हेमंत गडकरी यांच्यासह शहर अध्यक्ष अजय ढोके, विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे, चेतन शिराळकर, हर्षद दसरे,विभाग संघटक सागर नान्हे, अक्षय दहिकर,महिला सेना जिल्हाध्यक्षा अचला मेसन व कल्पना चौहान, महिला शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, विभाग अध्यक्षा रचना गजभिये, विभाग उपाध्यक्षा प्रिया बोरकुटे, प्रभाग अध्यक्ष रोशन इंगळे,अमेय पांडे, नंदू गेडाम, संजय पळसकर, साहिल बेहरे, उत्तम रागीट, देवेंद्र ठाकरे, जमशेद अन्सारी, सुधीर पळसखेडीकर, राजू पोलाखरे, विपीन धोटे,धनंजय काकडे यांच्यासह अन्य मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


MNS celebrates Hanuman Jayanti in Nagpur: Maha Aarti and Hanuman Chalisa recitation in devotional procession