गाऱ्हाणी मांडण्यासाठी काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल | - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०५ एप्रिल २०२२

गाऱ्हाणी मांडण्यासाठी काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल |महाराष्ट्राच्या राजकारणातील अलीकडच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यासाठी राज्यातील 28 आमदारांनी (Maharashtra Vidhan Sabha members) काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार काँग्रेसच्या १८ आमदारांनी सोमवारी ( ४ एप्रिल) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी  राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.  (congress mla maharashtra, Delhi)

महाराष्ट्राच्या राजकारणातील संसदीय कामकाजाची माहिती देण्यासाठी ५ व ६ एप्रिलला संसदेत आयोजित अभ्यासवर्गात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील काँग्रेसचे आमदार दिल्लीत दाखल झाले. यापैकी संग्राम थोपटे, विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, सुरेश वरपूरकर, राजेश राठोड, लहू कानडे, अमित झनक, कैलास गोरंट्याल, दयाराम वानखेजे, राजू पारवे, संजय जगताप यांच्यासह १८ आमदारांनी के.सी. वेणुगोपाल व खरगे यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना मिळत असलेल्या एकूणच वागणुकीबद्दल आमदारांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी पालकमंत्री बदलण्याच्या मागणीसाठी काही आमदार गेले आहेत.