Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

गुरुवार, एप्रिल १४, २०२२

अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून


भद्रावती येथील तरुणीच्या खुनातील महत्वाचा धागा सापडला; आणखी एक जण ताब्यात

भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापडलेल्या तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांनी आरोपींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. हत्येचा कट रचणाऱ्या तरुणीला अटक केल्यावर रात्री संशयित म्हणून एका युवकाला भद्रावती येथून अटक करण्यात आली असून, सध्या त्या युवकाची पोलिस सखोल चौकशी करीत आहे.

भद्रावती शहरातील सुमठाणा-तेलवासा रस्त्यावरील शेतात तरुणीचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीला मंगळवारी सकाळी भद्रावती येथील सुमठाणा परिसरातून अटक केली.


चंद्रपूर -दाताला मार्गावरील रामसेतू पुलाच्या खाली फेकले त्या तरुणीचे मुंडके
भद्रावती येथील मुंडके कापून हत्या केलेल्या महिलेची स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी ओळख पटवून गुन्हयाचा पर्दाफाश केला आहे. आज सायंकाळी चंद्रपूर दाताला मार्गावरील रामसेतू पुलाच्या खालील भागात सदर युवतीचे शीर मिळाले. आरोपीने त्या जागेवर शीर फेकले असल्याचे सांगताच स्थानिक गुन्हे शाखेने 2 गोताखोरांच्या मदतीने सदर शीर शोधून काढले.
अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीने केला मैत्रिणीचा खून

भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापडलेल्या तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांनी आरोपींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या घटनेचा उलगडा करण्यासाठी मागील आठवडाभरापासून जिल्हा पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत यातच या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आली असून तिनेच अपमानाचा बदला घेण्यासाठी खून केल्याचां संशय आहे.

अशी घडली घटना
मृतक व आरोपी हे दोघी रूममेट होत्या. काही महिन्यांपूर्वी या दोघींमध्ये काही कारणावरून भांडण झाले. तेव्हापासून आरोपी मैत्रिणीचा इतर मैत्रिणींसमोर अपमान करीत होती. वारंवार होणारा अपमान बघता मृतक युवतीच्या मैत्रिणीने तिला अद्दल घडवायचे ठरविले. तिने तिचे (अन्य आरोपी ) मित्राला हि गोष्ट सांगीतली. दोघांनी एकत्रीत मयताला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कट रचला . त्याप्रमाणे मयताला ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने दिनांक 03/04/2022 रोजी रात्री 08 वाजता वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व पाहीजे आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेवून गेले . रात्री 12:00 वा . सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेवून विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमीनीवर खाली पाडले. नंतर तिचे पाय प्रकडून मांडीवर चाकूने दोन वार केले. सदर वेळी अन्य आरोपी मयताचे पोटावर बसून प्रथम गळा दाबून खून केला . नंतर तिची ओळख पटू नये म्हणून दोघांनीही दोघाच्याही चाकूने आळी पाळीने मयताचा गळा कापला. तसेच मयताचे पुर्ण कपडे व मुडके घेवून मोटर सायकलवरून पसार झाले.

दि . 04 एप्रिल 2022 रोजी पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत भद्रावती ते तेलवासा रोड मायक्रॉन शाळे मागील पडीत शेत शिवारात अंदाजे 20 से 22 वर्षीय युवती मुंडके कापून निर्घुण हत्या करून निर्वस्त्र स्थितीत मिळून आली होती. तिचे शरीराला मुंडके (शिर) नव्हते . कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीच्या खुन करून तिची ओळख पटु नये म्हणून तिथे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमाविरूद्ध अपराध क्रमांक 141 / 2022 कलम 302 , 201 मा दं.वि.चा गुन्हा नोंदविण्यात आला .

सदर घटनास्थळी मा.पोलीस अधीक्षक साहे श्री . अरविंद साळवे , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी , स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ भेट देवून मृतदेहाचे व परिसराची पाहणी केली . मृतदेह निर्जनस्थळी मुंडके नसलेल्या नग्न अवस्थेत होता . आरोपीने मयताची ओळख पटू नये म्हणून तिचा शिर कापून नेले तसेचे कपडे सुद्धा काढून घेवून गेला अशा अवस्थेत कोणत्याही प्रकारचे पुरावा / खुना / निशानी नसल्यामुळे सदर मृत महीलेची ओळख पटविणे पोलीसांना आव्हाण होते.


असा केला तपास
पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व पथक तसेच सायबर सेल मधील सायबर एक्सपर्ट याचे मार्फतीने मृत महिलेच्या शरीरावरील खुना मृत देहाजवळ मिळालेल्या तिच्या वापराच्या वस्तू ईत्यादी शोध पत्रीका तयार करून शोध घेण्यात आला . तसेच चंद्रपूर व बाजुच्या सर्व जिल्हयातून या वयाच्या हरविलेल्या / पळून गेलेल्या मुलींची शहानिशा केली . परंतु उपयुक्त माहिती मिळून आली नाही . घटना घडून काहि दिवस होवून हरविलेल्या तक्रार प्राप्त झाली नाही . त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी तात्रीक तपास केला तसेच गोपनिय माहिती मिळविण्याचा अहोरात्र प्रयत्न केला . त्यामध्ये पोलीसाना यश आले .
गोपनिय माहितीदाराकडून सदर महिलेची ओळख पटविण्यात आली . तिचा मोबाईल क्रमांक प्राप्त करण्यात आला. त्यावरून तिच्या राहत्या घराचा रामटेक जि . नागपूर येथील पत्ता प्राप्त झाला. त्यावरून तिची मोठी बहीन हिवेशी संम्पर्क साधून ओळख पटविण्याची खात्री करण्यात आली . तिचे बहीनीने तिच्या शरीरावरील व्रण व वापरीतील वस्तू पाहून मृतक महिला हि तिची बहीन असल्याचे खात्री केली. सदर खुनातील आरोपी शोधण्याचे आदेश मा . पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे याना दिले .
त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. जितेंद्र बोबडे , स.पो. नि संदीप कापडे , पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेतील 20 अमलदार यांचे तिन वेगवेगळे पथके तयार केली.

स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सायबर सेल चंद्रपूर यांनी गुन्हयाचा तांत्रीक तपास केला . सदर तांत्रीक तपासाचे आधारे सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार एक महिला विधीसंघर्षग्रस्त बालक विचारपूस करुन ताब्यात घेण्यात आले .
सदरची कामगीरी मा.पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे , मा.अपर पोलीस अधीक्षक श्री . अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे , स.पो.नि. जितेंद्र बोबडे , स.पो.नि. संदीप कापडे , पो.उपनि अतुल कावळे , स.फौ. राजेंद्र खनके , पोड़वा संजय आतकुलवार , पो को सतिश बघमारे , पो.कॉ. गणेश भोयर , अनुप डांगे , मिलींद जांमुळे , संदीप मुळे प्रशांत नागोसे तसेच सायबर सेलचे पो.हवा . मुजावर अली , वैभव पत्तीवार , राहुल पोन्दे मास्कर चिंचवलकर , संतोष पानघाटे , उमेश रोडे यांनी केली .चंद्रपूर जिल्ह्यात गळा कापलेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडला  |

भद्रावती-तेलवासा (BHADRAWATI- TELWASA) रस्त्यालगत असलेल्या सुमठाणा ( SUMTHANA)शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणीचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. Date 4/04/2022

हा मृतदेह विवस्त्र अवस्थेत असल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलिस अधिक तपास करत असून, CHANDRAPUR POLICE उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. या प्रकरणी श्वानपथकाची देखील मदत घेण्यात येत आहे. सुमठाणा तेलवासा रोड लगत असलेल्या एका लेआऊट च्या शेवटच्या मागच्या भागांमध्ये सदर तरुणीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसर सिल केलेला आहे आणि कारवाई सुरू केली आहे. माहिती येईपर्यंत मृतक तिचे नाव आणि ओळख पटलेली असून, पोलिसांनी घटनेचा उलगडा करण्यासाठी तपास करीत आहे.


The body of the girl was found with her throat slit in Sumthana farmMurder of a friend by a friend to avenge the insult;

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.