महाकाली यात्रा निमित्ताने एस टी महामंडळ चंद्रपूर तर्फे स्पेशल बसेस सेवा सुरू | Mahakali Mandir Chandrapur ST Bus - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१४ एप्रिल २०२२

महाकाली यात्रा निमित्ताने एस टी महामंडळ चंद्रपूर तर्फे स्पेशल बसेस सेवा सुरू | Mahakali Mandir Chandrapur ST Bus

महाकाली यात्रा निमित्ताने एस टी महामंडळ चंद्रपूर तर्फे स्पेशल बसेस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्य पूजा होणार असल्याने भाविकांच्या सोयीसाठी विशेष बसेस सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. 
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून बंद असलेली चंद्रपूरचे आराध्य दैवत महाकाली देवीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठी दि. ७ एप्रिलपासून सुरू झाली. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात दाखल होत असून, चैत्र पौर्णिमेला देवीची विशेष पूजाअर्चा करण्यात येणार आहे. 


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, चंद्रपूर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ , चंद्रपर विभाग व नांदेड विभागाकडून यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांकरिता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.   Mahakali Mandir Chandrapur ST Bus

चंद्रपूर येथून नांदेड , यवतमाळ , पुसद , उमरखेड या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशां करीता न्यू इंग्लिश ग्राऊंड , स्थानिक विश्राम गृहा समोर , नागपूर रोड येथून सकाळी ७.०० ते सायं ६.०० या वेळेत दर अर्ध्या तासांनी बस सेवा सुरू आहे .

 Mahakali Mandir Chandrapur ST Bus

 आदिलाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांकरीता बागला चौक , महाकाली पोलिस चौकी समोरून सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत दर अर्ध्या तासांनी बस सेवा सुरू आहे . या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महाकाली मंदिर प्रशासनाने केले आहे. 


 Mahakali Mandir Chandrapur ST Bus