चोखामेळा मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

शनिवार, एप्रिल १६, २०२२

चोखामेळा मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान


चोखामेळा मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यावर व्याख्यान


ब्लू मिशन मल्टीपर्पज पब्लिक ट्रस्ट चंद्रपूर च्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्थानिक चोखामेळा मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर चमत्कार भांडाफोड प्रात्यक्षिकांसह व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी भूत ,भानामती, तंत्र मंत्र, जादूटोणा, करणी बुवाबाजी, देवी अंगात येणे आणि जादूटोणाविरोधी कायदा आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतीगृहाचे सचिव महादेव पुनवटकर होते तर ब्ल्यू मिशनचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. दुष्यंत नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.Lecture on Scientific Perspectives and Anti-Sorcery Law for Chokha Mela Girls' Hostel Students