जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना वनहक्क पट्टे; श्रमिक एल्गार, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मानले अधिकाऱ्यांचे आभार - KhabarBat™ | Breaking News India

Breaking

KhabarBat™ | Breaking News India

News Website | Breaking News | latest Update

सोमवार, एप्रिल १८, २०२२

जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना वनहक्क पट्टे; श्रमिक एल्गार, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मानले अधिकाऱ्यांचे आभार

वनहक्क कायदा अधिनियम 2006 च्या कायद्यान्वये जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासींना आज 18 एप्रिल रोजी वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले. याबद्दल श्रमिक एल्गार, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने अधिकाऱ्यांचे आभार मानले.

आदिवासींना वनहक्क दाव्यात त्रुटयांची पूर्तता करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक धोरण राबवून राजुरा उपविभागातील कोलाम आदिवासी बांधवांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी यावेळी श्रमिक एल्गार चे घनश्याम मेश्राम यांनी केली होती.
जिवती तालुक्यातील काकबन येथील आदिवासी बांधवांना आज तहसिलदार चिडे यांचे हस्ते वनहक्क धारकांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी भुजंगराव कोटणाके, मारोती सिडाम, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ सचिव महिपाल मडावी यांनी तहसिलदार चिडे, उपविभागीय अधिकारी खलाटे, जिल्हाधिकारी यांचे आभार मानले.
जिवती येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती सिडाम यांनी वनहक्क धारकांना शासनाने मदत करावी, असे मत व्यक्त केले.यावेळी मालकी हक्काचा प्रमाणपत्र मिळाल्याने सदर आदिवासी बांधव आनंद व्यक्त करत अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.