भास्कर घाट येथील गॅस शवदहन वाहिनीचे काम पूर्ण: नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


०७ एप्रिल २०२२

भास्कर घाट येथील गॅस शवदहन वाहिनीचे काम पूर्ण: नगराध्यक्ष शाम पांडे यांची माहिती

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथे भास्कर घाट स्मशानभूमी मध्ये विशेष निधीतून गॅस शव दाहनवाहिनी चे काम गेल्या ९ महिन्यांपासून सुरू होते. ते संपूर्णतः पूर्ण झाले असून जुन्नर शहरासाठी अत्यंत उपयुक्त असे हे काम असून सुमारे ८५ लक्ष रुपयांचा निधी सदरहू कामाला खर्च झाल्याची माहिती शाम पांडे यांनी दिली.


२४ गॅस सिलेंडर एका वेळी काम करणार असुन उर्वरीत २४ गॅस सिलेंडर राखीव ठेवण्यात येणार आहेत. अंत्यविधी साठी आरोग्य विभाग जुन्नर नगरपरिषद यांच्याकडे २५०० रुपयांची नावमात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.
२४ तास त्याठिकाणी प्रशिक्षित कर्मचार्याची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने असणार आहे. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण धार्मिक विधी करण्यासाठी बाहेरील बाजूस प्रशस्त जागा ठेवण्यात आलेली आहे. 
एकंदरीतच जुन्नर शहराच्या भविष्याची गरज लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गाचे संवर्धन देखील होऊन वायुप्रदूषणाला आळा बसणार आहे. ह्या कामासाठी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, शहर अभियंता विवेक देशमुख यांनी विशेष प्रयत्न घेतले असुन ठेकेदार राजू सापळे, मुकेश ताजणे, व्हिजन इन्फ्रा जेजुरी यांनी देखील दर्जेदार काम केल्याबद्दल उपस्थित नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक समीर भगत, भाऊ कुंभार, अविन फुलपगार, सुनील ढोबळे, सौ. कविता गुंजाळ, सौ. सुवर्णा बनकर यांनी कामाबद्दल समाधान व्यक्त केले.