केंद्र सरकार विरोधात शहर काँग्रेसचे शुक्रवारी महागाई चालिसा आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२१ एप्रिल २०२२

केंद्र सरकार विरोधात शहर काँग्रेसचे शुक्रवारी महागाई चालिसा आंदोलन
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी २२ एप्रिलला शहरातील पेट्रोल पंप समोर महागाई चालिसा आंदोलन करण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयभाऊ वेडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे , आमदार प्रतिभाताई धानोरकर , आमदार अभिजित वंजारी यांच्या मार्गदर्शनात आंदोलन होईल . आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केले आहे.

आंदोलन पहिले दिनांक : शुक्रवार , ता . २२ एप्रिल २०२२ रोजी वेळ : दुपारी ०४.०० वा . कोतपल्लीवार पेट्रोल पंप , जनता कॉलेज चौक , चंद्रपूर येथे तर दुसरे आंदोलन शुक्रवार , ता . २२ एप्रिल २०२२ रोजी वेळ : दुपारी ०५.०० वाजाता स्टेट बँकेसमोर , कस्तुरबा मार्ग , भानापेठ येथे होणार आहे. अशी माहिती शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिली.


Inflation Chalisa agitation of city congress against central government on Friday